उपक्रम

सेतूबंध-जागृत जाणीवांचा

सर्वांर्थाने समाजाला समर्पित अशा अनेक सामाजिक संस्था व कार्यकर्ते आज आपल्या आसपास आपल्याला दिसतात, परंतू या संस्थांचा इतिहास त्यांच्या उभारणी मागचे दिव्य यांची आपणास पुसटशी देखील जाणीव नासते. या इतिहासाचा अभ्यास केल्यावर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे संस्था उभारणीसाठी जेवढा वेळ आणि उर्जा त्या त्या व्यक्तीला आणि संस्थेला खर्ची घालावी लागली ती जर खरोखरीच प्रत्यक्ष कामात उपयोगात आणली असती तर समोर दिसत असलेल्या सामाजिक कार्याचा आवाका आणखी खूप वाढला असता. सामाजिक संस्थांची नेमकी हीच गरज लक्षात घेऊन ‘साद माणुसकीची सामाजिकता अभियान’ उभे राहिले आहे. या अभियानामार्ङ्गत आम्हाला खालील गोष्टी साध्य करायच्या आहेत.

  1. सामाजिक संस्थांच्या संसाधन विकासासाठी सहाय्य (चल, अचल, संपत्तीसह बौद्धिक व मनुष्यबळ संपत्ती निर्माणासाठी सहाय्य)
  2. सामाजिक संस्थांना अनुभवी व निष्णात व्यक्तींकडून वैधानिक व कायदेशीर बाबींवर मार्गदर्शन.
  3. सामाजिक संस्थांकडे उपलब्ध असलेली संपर्काची माहिती खुली करून ती कोणालाही उपलब्ध राहील यासाठी व्यासपीठ निर्माण करणे.
  4. समाजकार्यास इच्छुक व्यक्ती व संस्था यांच्यामधील एक पूल उभारणे.
  5. संस्था, समाजकार्यासाठी इच्छुक व्यक्ती, संपत्तीसहयोग ते संपत्तीदान करण्यास इच्छुक व्यक्ती या सर्वांचे एक नेटवर्क उभे करणे.
  6. या नेटवर्कचे प्रशिक्षण आणि कार्यशाळा आयोजित करणे.
  7. सर्व संस्थांची माहिती संकलित करून ती ‘ साद माणुसकीची फाउंडेशन ’च्या संकेतस्थळावर उपलब्ध करणे. वरील सर्व उद्दिष्टे साध्य करण्यासाठी ‘ साद माणुसकीची फाउंडेशन ’ एक ‘कन्सॉर्टियम’ म्हणून काम करणार आहे.

यासाठी सामाजिक संस्था आणि समाजकार्य करत असलेल्या आणि करू इच्छिणार्या व्यक्ती व संस्थांची सविस्तर माहिती संकलित केली जाईल. हिशोब चोख असणार्या आणि धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत सामाजिक संस्थांनी तसेच वैयक्तिक पातळीवर सामाजिक कार्य करणार्या व्यक्तींनी आपल्या कार्याच्या माहितीसह आमच्याकडे संपर्क साधण्याचे आम्ही आवाहन करत आहोत.
ङ्गाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री. हरीश व सौ. रोहिणी बुटले तसेच मेळघाट मध्ये स्वतःच्या गरजा अत्यंत कमी ठेवून आदिवासींच्या आरोग्यसेवेसाठी स्वतःचे आयुष्य पणाला खर्ची घालणारे डॉ. श्री. रविंद्र कोल्हे हे याच विचारांनी प्रेरित आहेत. डॉ. कोल्हे दाम्पत्याचे आयुष्य हे सर्वांना प्रेरणादायी आहेच. बुटले दाम्पत्याने देखील त्यांनी त्यांच्या आयुष्याच्या वाटचालीची दिशा देखील तशीच निश्चित केली आहे. 2025 साली बुटले दांपत्याने त्यांच्या नेहमीच्या कामातून बाजूला होऊन त्यानंतर पूर्णवेळ त्यावेळी ज्या ठिकाणी आरोग्य व शिक्षणाच्या समस्या असतील त्या ठिकाणी जाऊन कार्य करण्याचे निश्चित केले आहे.
यातील एक महत्वाची बाब म्हणजे बुटले दांपत्याने असे ठरवले आहे की मुलं कमवती झाल्यानंतर त्यांच्याजवळ असलेल्या संपत्तीचा कोणताही वाटा त्यांच्या मुुलांना मिळणार नाही. हा विचार म्हणजे मुलांकडे दुर्लक्ष करणे नसून त्यांना अधिक सक्षम करण्याचा आणि त्यांच्या जाणीवा प्रगल्भ करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. श्री. ईश्वरलाल परमार यांनी सद्संगाच्या माध्यमातून आध्यात्मनिष्ठ जीवन पद्धती रूजवण्यासाठी आपल्या आयुष्यातील बहुमुल्य वेळ तरूणांना जीवनाच्या आनंद प्राप्तीच्या मार्गावर कशी वाटचाल करावी याविषयी मार्गदर्शन करण्यात खर्ची घालत आहे.
याप्रमाणेच या ङ्गाउंडेशनच्या व्यासपीठावर नियामक, मार्गदर्शक व मंडळातील प्रत्येक व्यक्ती आपआपल्या काही ना काही वैशिष्ट्यासह ग्रामविकासाठी कटिबद्ध आहेत.

Concept By : Harish Butle

Links