• ' हा संकल्प आहे '
  तो केवळ शाब्दिक नसून त्यासाठीची दिशा आणि उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत. ती आपण जाणून
  घेतल्यावर आपल्याला या वेगळ्या प्रवासाचे मोल तर
  कळेलच पण आपणही या प्रवासात आनंदाने सहभागी व्हाल, याची आम्हाला खात्री आहे.
 • Find Your Village Friend
 • Find Your School

आमच्याबद्दल

' हा संकल्प आहे '

तो केवळ शाब्दिक नसून त्यासाठीची दिशा आणि उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत. ती आपण जाणून घेतल्यावर आपल्याला या वेगळ्या प्रवासाचे मोल तर कळेलच पण आपणही या प्रवासात आनंदाने सहभागी व्हाल, याची आम्हाला खात्री आहे.

आमचे ध्येय

शहरात जाऊन स्थैर्य प्राप्त झालेल्या व्यक्ती पुन्हा आपल्या गावाकडे वळून, तेथील समस्या सोडविण्यात सहभागी झाल्या तर त्या त्या गावाचा विकास वेगाने होईल. नेमका हाच विचार आम्ही साद माणुसकीची अंतर्गत जगा आणि जागा या संकल्पनेतून मांडत आहोत. आपण जगताना जागरूक राहिले पाहिजे. ज्यांनी समृद्धी प्राप्त केली आहे त्यांनी खेडेगावाकडे ज्या पद्धतीने वळून बघायला हवे होते ते न पाहिले गेल्याने आज गावांसमोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. त्यामुळे याबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करून गावांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आपण गावासाठी काहीतरी करावे असा विचार प्रत्येकाच्या मनात निर्माण करणे हा या अभियानाचा हेतू आहे.

गाव- खेड्यातून शहरात गेलेली माणसे समृद्ध झाल्यानंतर म्हणावे त्या प्रमाणात आपल्या गावाकडे ङ्गिरून बघत नाहीत. असे का होते? ते गावाकडे मुलांच्या, नातेवाईकांच्या लग्नात, जत्रा, उरूस, सण-समारंभात जरूर जातात. मात्र, शैक्षणिक सोयी किंवा सार्वजनिक व्यवस्थेबाबत उदासीन का असतात? आपण काही तरी करायला जाऊ आणि गावातील राजकारणामुळे नाहक आपण विरोधक/नाराजी ओढवून घेऊ, असे त्यांना वाटते का? गावातील समृद्ध झालेल्या इतर मित्रमंडळींच्या संपर्कातून काही विशेष करण्याचा प्रयत्न होताना का दिसत नाही? मंदिर, समाजभवन इ. साठी निधी जमवणारे शैक्षणिक सुविधांना का प्राधान्य देत नाहीत?

या संकल्पने विषयी मान्यवरांनी मांडलेले विचार:-

 1. ग्रामविकास झाला पाहिजे आणि त्यासाठी स्वत:हून पुढाकार घेतला पाहिजे. आपली प्रगती झाली आता जे मागे राहिले आहेत त्यांच्याकडे बघूया, अशी भूमिका घेतल्यास गावे समृद्ध व्हायला वेळ लागणार नाही. प्रत्येक व्यक्तीने आपली मर्यादा ओळखून, अतिरिक्त संपत्ती मग ती चल किंवा अचल स्वरूपाची असेल ती समाजासाठी वापरून त्यातून आत्मिक समाधान मिळविण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ते आत्मिक समाधान मिळविण्यासाठी ‘जगा आणि जागा’ हाच विचार परिपूर्ण वाटतो आणि ‘साद माणुसकी’ची सामाजिकता अभियानातून ही संधी आपणापुढे आली आहे. त्यात आपला सहभाग राखून समाजकार्यातील आपला खारीचा वाटा प्रत्येकाने राखावा - गिरीश प्रभुणे
 2. गावाकडे वळून बघणे हे प्रत्येकाला कर्तव्य वाटले पाहिजे. अशा व्यक्तींची संख्या वाढण्याची गरज आहे तरच खेड्यापाड्यांत आधुनिक सोयी-सुविधा निर्माण होऊ शकतील. ‘साद माणुसकीची’साठी अनेक व्यक्ती मदत करायला तयार आहेत. ङ्गक्त आपण त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. - डॉ. विजय वाढई
 3. मुळात प्रत्येक माणसाने ‘आपण समाजाचं देणं लागतो’ हा विचार मनात आणावा, याच दृष्टीने आपण ज्या गावातून, भागातून आलो, त्याचे स्मरण असावे. पारदर्शकता, नियोजनबद्धता, सहयोग, कृतज्ञता, योग्य मानसिकता या पाच गुणांच्या आधारावर खर्या अर्थाने आपण सामाजिकता जपली पाहिजे. या पाच पैलूंवरच ‘जगा आणि जागा’ खर्या अर्थाने सङ्गल होईल, त्यासाठी प्रत्येकाने जागरूक व सकारात्मक मानसिकता ठेवली पाहिजे. - प्रदीप लोखंडे
 4. आपले गाव, मूळची माहिती नसल्यास आपण कसे कार्य करू शकतो का? असा मनात विचार न आणता आपण कोणत्याही भागात, गावात, परिसरात अथवा मित्रांच्या गावात आवश्यक तो बदल घडवून आणू शकतो.- डॉ. श्रीराम गीत
 5. आपण ज्या गावातून, भागातून आलो, त्याविषयी आपल्याला ओढ, कृतज्ञता व्यक्त करण्याची सुवर्णसंधी अशा कामातून मिळत असते. ती संधी घेता आली पाहिजे, त्यातून मिळणारे समाधान वेगळे असते. - श्री. विवेक वेलणकर
 6. मी काहीतरी मोठा आहे अशी भूमिका घेऊन गावासाठी काम करणारी माणसे यशस्वी झालेली दिसत नाहीत. मी यांच्यासाठी काहीतरी करतोय हा अहंकार चुकीच्या दिशेने घेऊन जातो. याबाबत सजग राहणारे मोठे काम उभारू शकतात. मी लोकांसाठी काम करायला जातो या भावनेपेक्षा या लोकांमध्ये काम करायला जातो हि भावना निर्माण व्हायला हवी. आय एम विथ द पीपल, नॉट फॉर द पीपल अशी भावना गावात काम करताना असायला हवी. देण्याची भावना निर्माण झाली कि समस्या निर्माण होतात याचे भान ठेवायला हवे. त्यामुळे साद माणुसकीची अंतर्गत ‘जगा आणि जागा’ या संकल्पनेतून भावना वाढीस लावणे महत्वाचे आहे. दगडाला शेंदूर फासून काम करणारे अनेक आहेत परंतु दगडावर टाकीचे घाव घालून त्या पद्धतीने काम करणारे कमी आहेत. - अन्वर राजन

आम्ही नेमके काय करतो ?

मित्रहो, माणुसकीने वागणे ही काही ठरवून करणारी गोष्ट नाही. त्यात गरीब-श्रीमंत, जात-पात हा भेदाभेद नाही. लहान मोठा असा कोणता निकष नाही. ती आहे एक निखळ वृत्ती. कोणत्याही वळणावर प्राप्त परिस्थितीत आपल्या कुवतीनुसार जो खरा गरजू आहे त्याच्या मदतीला धावून येणे हीच खरी मानवसेवा! प्रसंगी आपल्या भाकरीतील चतकोर जो आनंदाने एखाद्या गरजूला देवू शकतो तोच खरा माणूस आणि त्याच्यात बाणलेली वृत्ती म्हणजे माणुसकी! आज समाजातील अनेक घटक असे आहेत की ज्यांना अशा मदतीच्या हाताची गरज आहे. शिक्षण असो वा आरोग्य, बालके असोत व वृद्ध, पुरुष असो वा स्त्री, कुठे न कुठे, कोणत्या न कोणत्या प्रकारची मदत उभी राहणे आवश्यक असल्याचे जाणवते. अर्थात तेवढी संवेदनशीलता जागी असायला हवी. ती असेल तर मग अशी मदत पोहोचायला हव्या असलेल्या जागा जागोजागी दिसू लागतात.

आम्हाला याच जाणिवेतून ‘माणुसकीची साद’ घालावीशी वाटली आणि आम्ही या विचाराचे एक मूर्त स्वरूप घेऊन कार्य सुरू केले आहे हे आपण जाणताच. सर्व ठिकाणी एक व्यक्ती अथवा एक संस्था पोहोचू शकत नाही. याला अनेक मर्यादा आहेत म्हणूनच आम्ही समाजासाठी काही करू इच्छिणार्या, सध्या काही करत असलेल्या समविचारी संस्थांना एका व्यासपीठावर आणण्याचे ठरविले आहे.

आम्ही शिक्षण, आरोग्य, वृद्धसेवा आणि कौशल्य विकास अशा चार आघाड्यांवर काम करायचे ठरविले आहे. त्या-त्या क्षेत्रातील सामाजिक कार्य करणार्या, अथवा या कामाला खर्या अर्थाने न्याय देऊ शकणार्या व्यक्ती आणि संस्थांचे जाळे उभे करून एका व्यासपीठावरून आणखी भरीव कार्य उभे राहावे असा यामागचा प्रामाणिक हेतू आहे.

शिक्षण क्षेत्रासाठी सुरूवात करताना या सामाजिक अभियानात राज्यभरातून चांगल्या शिक्षकांचा सहभाग दिवसेंदिवस वाढत आहे. मुलांचे शिक्षण सुरू होते ते कुटुंबात. आई-वडील हे मुलाचे आद्य गुरू. त्या नंतरच्या टप्प्यावर येते ती शाळा आणि शिक्षक. या टप्प्यावर उचित शिक्षण मिळाले तर सर्वच अर्थाने पाया भक्कम होतो आणि अनेक गोष्टी सुकर होतात, यासाठी शिक्षकांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा ठरतो, त्यासाठी शिक्षकांच्या गुणवत्तेबरोबरच व्यक्तिमत्त्वाचा गाभा चांगला असायला हवा. तिथे संवेदनशीलता हवी, माणुसकीचा झरा वाहायला हवा, वृत्ती निर्मळ हवी. असे असेल तरच त्यांच्या समोरून पुढे जाणार्या पिढीचे भवितव्य आकार घेऊ शकणार आहे. शिक्षकांमध्ये अशी वृत्ती असेल तर प्रश्नच नाही. त्या वृत्तीला सोबत घेऊन अनेक गोष्टी सहजसाध्य आहेत. मात्र इथे विशिष्ट विचारांना दिशा देण्याची गरज असते. अनेक हात एकाच ध्येयाने प्रेरित होऊन गुंफले गेले तर ही साखळी तयार होईल आणि या सामाजिक अभियानातून रचनात्मक कार्य उभे राहील. ज्यांनी अशा पद्धतीने काही करण्याचा विचार केला नसेल तर त्यांना अशा कार्यात जोडून घेण्यासाठी व ही वृत्ती रुजविण्यासाठी सामाजिकता अभियानाअंतर्गत प्रयत्न केले जाणार आहेत.

साद माणुसकीची जिल्ह्याकडून तालुका-गावाकडे अशा पद्धतीने सामाजिकता अभियान उभारताना दोन्ही टोकांवरील सहभागींना संवादातून सर्वदूर पोहोचता यावे ही गरज असणार आहे. यातून प्रश्नाची मांडणी होईल तसेच सकारात्मक कार्य अधिकाधिक लोकांपर्यंत जाऊन अनेकांना कार्य करण्याची प्रेरणा मिळेल. ‘तुम्ही-आम्ही पालक’ हे मासिक या दोन टोकांवरील सहभागींना एक संवादाचा पूल बांधणारे माध्यम म्हणून राहील. ‘तुम्ही-आम्ही पालक’ हे विद्यार्थी-पालक-शिक्षक यांच्यातील सुसंवाद घडवून आणण्यासाठी जागरूक पालकत्वाला वाहिलेले केवळ वाचनीयच नव्हे तर संग्राह्य असे दर्जेदार, कालसुसंगत, बहुरंगी, जाहिरातविरहित, संपत्तिसहयोगातून समाजाला समर्पित, सुजाण पालक, शिक्षक, शैक्षणिक व सामाजिक संस्थांनी आपलंसं केलेलं महाराष्ट्रातील एकमेव मासिक माध्यम असून या अभियानातील सहभागींसाठी आणि पालकांसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल.

Donate (सहयोग)

State District Tehsil Cluster Village School
Name Email Contact Working At Service job Desc

Find Your School