उपक्रम

संपत्ती सहयोग ते संपत्तीदान

जगा आणि जागा : ‘समृद्धीतून सहयोग’ हा पहिला टप्पा बनला तर ‘संपत्तीसहयोग ते संपत्तीदान’ हा प्रकल्प दुसरा टप्पा आहे, असे म्हणता येईल. मनुष्यप्राणी आपल्या जीवनात सर्वात जास्त आसक्ती दाखवतो ती त्याने कमावलेल्या संपत्तीविषयी. काही स्नमाननीय अपवाद वगळता जवळपास सर्वचजण आपल्या आयुष्याचा बहुतांश वेळ व ऊर्जा ही फक्त संपत्ती कमावण्यात खर्च करतात. बर्याचदा ही संपत्ती गरजेपेक्षा जास्त असते, हे दिसून येते, त्यामुळे एकीकडे समाजात काही जणांकडे गरजेपेक्षा जास्त संपत्ती असताना समाजात असेही घटक दिसून ज्यांच्याजवळ गरजेपुरतीही संपत्ती नसते. हा विरोधाभास काही प्रमाणात कमी करण्यासाठी ‘संपत्तीसहयोग ते संपत्तीदान’ हा प्रकल्प हाती घेतला आहे. ज्यांच्याकडे गरजेपेक्षा जास्त चल (पैसे, रोखे, समभाग) किंवा अचल (वेळ, कष्ट, बुद्धी, स्थावर मालमत्ता) संपत्ती आहे ती त्यांच्याच हयातीत, त्यांच्याच सं’तीने, ’र्जीने व योग्य पद्धतीने गरजू लोकांच्या उपयोगात आणणे, हा या प्रकल्पाचा मुख्य हेतू आहे. आपल्या संपत्तीचा मर्यादित अथवा दीर्घ मुदतीसाठी योग्य उपयोग (सहयोग) ते कायमस्वरूपी 100% संपत्तीदान अशा विविध पर्यायांचा दाता विचार करू शकतो. ‘साद माणुसकीची फाउंडेशन’ हे अशा अंशतः/संपूर्ण दान केलेल्या संपत्तीच्या योग्य व्यवस्थापनाची जबाबदारी उचलण्यास कटिबद्ध आहे.
डॉ. रोहिणी व श्री. हरीश बुटले दांपत्याच्या मालकीची पुण्यातील सदनिका हे संपत्ती सहयोगाचे उत्तम उदाहरण..! बुटले दांपत्याने त्यांच्या मालकीची व गरजेपेक्षा जास्त असलेली पुण्यातल्या सिंहगड रोड येथील सुसज्ज सदनिका संपत्तीसहयोग प्रकल्पाअंतर्गत साद माणुसकीची फाउंडेशनकडे नोंदवली. पुण्यात येणार्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या निवासासाठी या जागेचा उपयोग व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली. ‘साद माणुसकीची फाउंडेशन ’च्या माध्यमातुन गेले 2 वर्षे समाजसेवी कार्यकर्त्यांसाठी तात्पुरता निवारा म्हणून ही वास्तू उपलब्ध आहे.

Concept By : Harish Butle

Links