उपक्रम

सादग्राम

एखाद्या गावात समाजातील सर्व घटकांनी मीळून एकत्रीतरीत्या येऊन गावाच्या विकासाला हातभार लावण्यासाठी सहकार्य करावं, यासाठी ही संकल्पना ’साद माणुसकीची फाउंडेशनच्या माध्यमातून पुढे येत आहे.ग्राम विकासाचे अनेक टप्पे समर्थपणाने ओलांडायचे असेल तर एकटा गावकरी, एकट्या सामाजिक संस्था आणि सरकारला ते शक्य नाही. खरंतर सामाजिक संस्था आपापला अजेंडा घेऊन ग्रामविकासाचे प्रकल्प राबवित असतात. पण अंतिमतः समग‘ ग्रामविकास ग्रामस्थांच्या सहभागाशिवाय साध्य करू शकत नाही. हा ग्रामविकास गावातील इतर सोयी सुविधांबरोबरच वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक विकासाला महत्व देऊन गावकऱ्यांशी स्नेहबंध प्रस्थापित करूनच शक्य आहे. त्यांच्या सहभागाने बालक, युवक, महिला, ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक यांच्या सक्षमीकरणाला प्रोत्साहन देऊन गावाच्या विकासाचा विचार मोठ्या पडद्यावर आणणे सहज शक्य होऊ शकते. याचा अर्थ गावाचे शहरीकरण करणे असा होत नाही. तर ग्रामीण भागांकडे आज ज्या आधुनिकीकरणाने पाठ विफरवली आहे त्याला ही ’सादग्राम’ संकल्पना योग्य उपाय असू शकेल. म्हणूनच ’साद माणुसकीची फाउंडेशन अनिवासी -गावकरी, ग्रामस्थ, विविध क्षेत्रात वेगवेगळया समस्यांवर कार्यरत असलेल्या सामाजिक संस्था आणि शासन या सर्वांच्या सहभागातून समग्र आणि संपन्न ग्राम विकासाचे मॉडेल राबविणार आहे. यासाठी ग्रामस्थांनी आणि गावातून बाहेर पडलेल्या अनिवासी ग्रामस्थांनाही प्रमुख व मोठा वाटा उचलावा लागणार आहे. ज्या ग्रामस्थांना अशा ’सादग्राम संकल्पनेच्या माध्यमातून आपल्या गावाचा विकास होण्याच्या दृष्टीने पाऊले उचलावीशी वाटतात, त्यांची ’साद माणुसकीची फाउंडेशन’ स्वागत करीत आहे.

या सादग्रामसाठी कसे सहभागी होऊ शकाल?

गावातील सांस्कृतिक , सामाजिक विकासासाठी गावकऱ्यानी वेळोवेळी बैठक घेऊन सर्वानुमते निर्णय घेणे व ते निर्णय प्रत्यक्षात अंमलात आणण्याच्या दृष्टीने ‘साद माणुसकीची फाउंडेशन ने ‘सेतुबंध’च्या माध्यमातून निर्देशित केलेल्या संस्थांना यथोचित सहकार्य करून.ग्रामविकासाठी लागणारा आर्थिक सुविधांचा योग्य तो निधी स्थानिक प्रतिनिधी, ग्रामपंचायत निधी, सरकारी विविध योजना यांचा योग्य तो विनियोग करण्यासाठी गावच्या विकासासाठी आखलेले गावपातळीवरची धोरण ठरवून.

Concept By : Harish Butle

Links