उपक्रम

माणुसकी सन्मान

आजच्या स्पर्धेच्या युगात माणूस तंत्रज्ञानात, आधुनिकीकरणाच्या स्पर्धेत अधिका अधिक प्रगती होत असताना दुसरीकडे माणुसकीचा गळा घोटला जातोय की काय अशी शंका सभोवताली घडणाऱ्या घटना पाहून वाटायला लागते. या घटना समाजातल्या जणू असंवेदनशील मनाची पावती देत राहतात. माणसाने तंत्रज्ञानात, आधुनिकीकरणाच्या सोयी-सुविधांमध्ये प्रगती केली असली तरी दुसरीकडे माणुसकीची पडझड होत आहे हे आपल्याला दिसते. तरीही माणुसकीची बीज रोवणाऱ्या व्यक्तीही समाजात घट्ट पाय रोवून उभ्या राहतात आणि एका नव्या उत्तीक्रांतीची ते शिलेदार ठरतात. तर वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याकरिता प्रसंगी आपले घरदार सोडून समाजात झटत असतात. माणुसकीची बीजे रोवून जिद्दीने वटवृक्षात रूपांतर करणार्या व्यक्तींचा यथोचित सन्मान होणे गरजेचे आहे. एकूणच सर्वच क्षेत्रात स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाल्याने प्रत्येक क्षेत्रातल्या व्यक्तींचा सन्मान करण्याची पद्धत रूढ होताना दिसतेय. एकीकडे सजनांचा सुकाळ दिसत असतानाच दुसरीकडे लक्षात राहण्याजोगे सन्मान असे किती आहेत? सन्मानामुळे सन्मान प्राप्त व्यक्तीची प्रतिमा अशा सन्मानामुळे खरंच उंचावते का, हा प्रश्न उरतोच. त्यामुळे तळागाळातल्या प्रामाणिक सामाजिक कार्यकर्त्यांच्या योग्य त्या काळाची दखल घेतली जात नाही. अशा व्यक्तींना शोधून त्यांचा यथोचित सन्मान करून त्यांच्या कार्याला प्रोत्साहन दिले तर त्या कार्यकर्त्यास काम करण्यास अधिक हुरूप येतो हे सन्मान सभारंभपूर्वक त्या त्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या प्रतिथयश व्यक्तींच्या हस्ते दिले जातात. त्यामुळे हे दोनही सन्मान महाराष्ट्रात नावाजलेले सन्मान म्हणून ओळखले जातात. महापालक सन्मानाचे प्रथम मानकरी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दाम्पत्य हेमलकशाचे डॉ. प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे (2013) तर पुण्यातील डॉ. कुमार सप्तर्षी व डॉ. उर्मिला सप्तर्षी (2014),

मेळघाटातील डॉ. रविंद्र कोल्हे व डॉ. स्मिताताई कोल्हे (2015), लातूरचे श्री. दिलीप व सौ. सुनिता अरळीकर (2016), दापोलीचे डॉ. राजाभाऊ व सौ. रेणुताई दांडेकर (2017) या दाम्पत्यांना सन्मान प्रदान करण्यात आला. यावर्षीचा सन्मान हा राष्ट्रीय पातळीवर असून आंतरराष्ट्रीय ‘ख्यातीचे भारताचे जलपुरूष डॉ. राजेंद्रसिंहजी आणि सौ. मीना सिंहजी (2018) यांना प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे संस्थापालक सन्मान हा नाशिक जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाच्या सरचिटणीस श्रीमती निलीमाताई पवार (2016) व लातूर पॅटर्नचे जनक प्राचार्य अनिरुद्ध जाधव (2017) यांना प्रदान करण्यात आलेला आहे. यावर्षी वरोऱ्याच्या ज्ञानदा वसतिगृहाचे संस्थापक प्रा. मधुकरराव उपलेंचवार (2018) यांना यावर्षीचा संस्थापालक सन्मान प्रदान करण्यात आला. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तीला असाच एक ’माणुसकीचा सन्मान देण्यात येणार असून या सन्मानाच्या निवडीसाठी साद माणुसकीची फाउंडेशन वतीने एक समीती नेमण्यात येईल.

Concept By : Harish Butle

Links