कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समग्र ग्रामविकासाची नवी दिशा

 • टिपणी / आवाहन क्र १ (रविवार, ५ एप्रिल २०२०)

  1

  ग्रामीण शिक्षण सुधारणा

  ठरल्याप्रमाणे आज 5 तारखेपासून ग्रामीण शिक्षण सुधारण्यासाठी *शिक्षण* या विषयावर प्रदीर्घ चर्चा झाली. ग्रामीण भागातील शिक्षणाच्या अडचणी आणि त्यावर भविष्यात करायचे उपाय यावरील काही सूचना आल्या. त्यातील काही सूचना आपल्या माहितीसाठी पाठवत आहोत. हा ग्रुप तयार करताना आम्ही काही अटी घातल्या होत्या आणि खरंच सांगतो जसे आम्हाला *महापालक सन्माना* साठी त्या अटी पूर्ण करणारे जोडपे शोधायला जड जाते त्याचप्रमाणे या चर्चेसाठी आम्ही ज्या दहा अटी घातल्या होत्या त्या दहाच्या दहा अटी पूर्ण करणारे फारच थोडे मान्यवर उपलब्ध झालेत. परंतु जे कोणी त्या सगळ्या अटी मध्ये बसणारे आहेत ते सर्व आपापल्या क्षेत्रातील दिगग्ज आहेत. आणि त्यामुळे चर्चा अतिशय सकस होत आहे. उद्या देखील म्हणजे सोमवारी दि 6 हा विषय पुढे सुरू राहील ज्यांना ग्रामीण शिक्षण व्यवस्था विषयात रस आहे, अशांनी आम्हाला सकाळी 10 पर्यंत कळवावे. मंगळवारी दि 7 ला आम्ही *ग्रामीण आरोग्य व्यवस्था* या विषयावर बोलणार आहोत ग्रामीण आरोग्याशी संबंधित चर्चेला इच्छुक असतील त्यांनी मला माझ्या पर्सनल व्हाट्सअप वर सोमवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कळवावे. आजची चर्चा 25 पानांपेक्षा जास्त मोठी होती त्यातील काही अपेक्षित अश्या ढळक सुधारणा खालीलप्रमाणे. सूचना सलग आणि एकापाठोपाठ एक असतीलच असे नाही.

  1. केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्या शाळा भेटी संख्या निश्चित करून ती माहिती ऑनलाईन स्वरूपात घेता येईल.
  2. पर्यवेक्षक यंत्रणेतील पदे ज्येष्ठते सोबतच त्यांचे शिक्षणातील काम, गुणवत्ता उपक्रम याचा विचार करून भरता येतील.
  3. पर्यवेक्षीय यंत्रणा सहभागी झाल्यानंतर त्यासाठीचा एक ब्रिज कोर्स तयार करण्यात यावा. तो कोर्स पूर्ण केल्यानंतर त्याचे मूल्यमापन करण्यात यावे व त्यानंतरच त्या पदाची वेतनश्रेणी देण्यात यावी.
  4. दर दहा वर्षं देण्यात येणाऱ्या वेतनश्रेणीचा विचार करताना शिक्षकाचे मूल्यमापन करणारी व्यवस्था विकसित करावी.
  5. शिक्षकांच्या कामाचे मूल्यमापनाचे निकष सूक्ष्म व अधिक वस्तुनिष्ठ करण्यात यावे.
  6. प्रशिक्षणाच्या दरम्यान मिळणाऱ्या ज्ञानाचे उपयोजन कितपत करण्यात येत आहे याची पडताळणी सातत्याने करण्यात यावी .
  7. सर्व स्तरावरील प्रशिक्षणासाठी केंद्रप्रमुख ,विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांना प्रशिक्षक म्हणून नियुक्त करावे. त्यामुळे त्यांना पुन्हा प्रशिक्षण देण्याची गरज भासणार नाही .प्रशिक्षण द्यावयाचे असल्याने त्या घटकाचा अभ्यास उत्तम होईल .त्याचा परिणाम शाळा भेटीवर, वर्ग भेटीवर झालेला दिसून येईल. अशा स्वरूपात काम केल्यानंतर त्यांच्या कामाची दखल गोपनिय अभिलेखात घेण्यात यावी.
  8. अशैक्षणिक कामांच्या बाबत वास्तविक स्थिती पेक्षा बोभाटा फार होतो. आपल्याकडे जर परफेक्ट प्लॅनिंग असेल तर ही कामे फार त्रास देत नाहीत. काही अनावश्यक कामे आहेत पण ती आपल्याच पातळीवर दुर्लक्षित केली तरी चालते. LMS सारखी व्यवस्था या प्रश्नावर उत्तर म्हणून दमदारपणे पुढे येऊ शकते.
  9. शिक्षकांच्या गटाची वर्गवारी ढोबळ मानाने खालील प्रमाणे करू शकतो 20% - स्वयंप्रेरित 30 % - 20%चे अनुकरण करणारे 30% - वरील दोन घटकांची कामे चालू झाल्यानंतर इतरांच्या रेट्याने जागे होऊन काम सुरू करणारे. 20% - संघटना, राजकारण, बँका, हुजरेगिरी करणारे. शाळा व शिक्षण या व्यतिरिक्त इतर कामात रस असणारे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शैक्षणिक कामामुळे शिक्षण क्षेत्राचे कसे नुकसान होत आहे हे रंगवून सांगणारे... शेवटच्या घटकाला नीट करण्यासाठी पर्यवेक्षण व्यवस्था सक्षम असणे खूप गरजेचे आहे. शब्बासकी असो किंवा शिक्षा वेळेत मिळाली तरच कामाची असते हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.
  10. नेतृत्व(मुख्याध्यापक) व पर्यवेक्षण व्यवस्था जास्तीत जास्त सकारात्मक व मजबूत केल्याने बऱ्याच प्रश्नांवर उत्तरे मिळतील. यासाठी केवळ सेवा वरिष्ठ रीतीने बढती देऊन पदे भरण्यापेक्षा, धाडसी निर्णय घेऊन स्पर्धेतून सक्षम व्यक्तीच त्या पदावर जातील अशी व्यवस्था केली पाहिजे. योग्य व्यक्ती योग्य पदावर असली तर सगळे चित्र बदलून जाऊ शकते हा मला विश्वास आहे.
  11. शिक्षणक्षेत्राला शक्य असल्यास अत्यावश्यक सेवेचा दर्जा देऊन संघटना व राजकारण पूर्णपणे संपवले पाहिजे. ज्याला काम करायचं नाही तेच बऱ्याचदा या गोष्टींचा आधार घेतात व समाजामध्ये सर्वांबद्दल चुकीचे मेसेज जाणारी कृत्ये करत असतात. शिक्षकांच्या आर्थिक प्रश्न वगळता फार काही विधायक गोष्टींबद्दल संघटनेने आवाज उठवल्याची फार दुर्मिळ उदाहरणे असतील.
  12. मॉडेल स्कूल तयार करून काही आदर्श उदाहरणे सर्वांसमोर ठेवली गेली पाहिजेत. त्यासाठी तिथे असणाऱ्या स्वयंप्रेरित शिक्षकांना स्थैर्य देऊन स्वातंत्र्य दिले गेले तर शासनाला कुठलीही झळ न बसता अशा शाळा उभ्या राहू शकतील. याचा फायदा असा होतो की आपला समाज हा केवळ ऐकून विश्वास ठेवीत नाही. मात्र प्रत्यक्ष पाहिले तर त्याचे अनुकरण केल्याशिवाय राहत नाही. म्हणून यासाठी काही आदर्श उदाहरणे समोर असणे गरजेचेच असते. चर्चेतील यांची नावं मुद्दामहून दिलेली नाही. ज्यावेळी पूर्ण रिपोर्ट तयार होईल त्यावेळी सर्वांची नावे दिली जातील.
 • टिपणी / आवाहन क्र २ (सोमवार, ६ एप्रिल २०२०)

  2

  ग्रामीण आरोग्यसेवा सुधारणा

  तत्पूर्वी, ग्रामस्थांनो आपण आपल्या गावात खाली दिलेल्या किमान सुविधा आहेत का? याची माहिती घ्या आणि त्याप्रमाणे आपणास त्या योग्य रीतीने मिळत आहेत ना ? त्याची शहानिशा करा. त्या मिळत नसतील तर गावच्या सरपंच यांना आणि ग्रामसेवकांना जरूर विचारा. त्यांनी उत्तर दिले नाही तर जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांपर्यंत आपण जाऊ शकता. या विषयावर चर्चा करण्यासाठी आरोग्य सेवेत कार्यरत असणाऱ्या मान्यवर दिग्गज, संस्था आणि त्यांचे प्रतिनिधी यांना विनंती आहे की त्यांनी आमच्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी व्हाट्सअप्प मेसेज करावा. आपलं काम आणि अनुभव योग्य वाटल्यास आम्ही आपणास चर्चेसाठी पाचारण करु. धन्यवाद ।

  दवाखाना : प्राथमिक आरोग्य केंद्र | उप आरोग्य केंद्र | ए एन एम | आशा वर्कर | एम पी डब्ल्यू | औषधाचे दुकान | जेनेरिक औषधं

  आरोग्यसुविधा : लसीकरण | कुपोषण निर्मूलन | सुरक्षित बाळंतपण | माता व बालसंगोपन | कुटुंबनियोजन | किटकजन्य आजार नियंत्रण | जलजन्य आजार नियंत्रण | कृष्ठरोग निर्मूलन | क्षयरोग नियंत्रण | हत्ती रोग निदान | मोतीबिंदू निर्मूलन | गुप्त रोग निदान व उपचार | शालेय आरोग्य तपासणी | तंबाखू आणि गुटखा नियंत्रण | किशोरवयीन मुलामुलींचे आरोग्य व शिक्षण

  तर मग काय काय वैद्यकीय सुविधा आणि सेवा उपलब्ध आहेत आपल्या गावात ? मित्रहो काल आणि परवा *ग्रामीण शिक्षणाच्या* सुधारणांसाठी अतिशय सकस अशी चर्चा झाली आणि त्यातून खूप चांगल्या सूचना आल्यात आजही ती चर्चा सुरू आहेच आणि आज संध्याकाळ पर्यंत आणखी काही महत्त्वाच्या सूचना प्राप्त होतील. उद्या पासून आपण *ग्रामीण आरोग्य सेवा* आणि त्या सुधारणांच्या दृष्टिकोनातून नेमकं काय केलं पाहिजे यावर दोन दिवस चर्चा करणार आहोत.

 • टिपणी / आवाहन क्रमांक ३ (मंगळवार, ७ एप्रिल २०२०)

  3

  शेती , शेतीपूरक व्यवसाय आणि पशुधन

  पर्यावरणात झालेल्या बदलामुळे सततचा दुष्काळ, वादळ वारा गारपीट आणि कधी पुरामुळे होणारे शेतीचे नुकसान आणि तुटपुंजी शेती या पार्श्वभूमीवर *शेती, शेतीपूरक व्यवसाय आणि पशुधन* या विषयावर चर्चा करण्यासाठी या क्षेत्रातील कार्यरत असणारे मान्यवर संस्था आणि त्यांचे प्रतिनिधी किंवा दिग्गज यांना आम्ही निमंत्रित करत आहोत. ज्यांच्यापर्यंत आम्ही थेट पोहोचू शकलो नाहीत त्यांनी आमच्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी व्हाट्सअप्प मेसेज करावा. आपलं काम आणि अनुभव योग्य वाटल्यास आम्ही आपणास चर्चेसाठी पाचारण करु. धन्यवाद !

  खालील सर्वच विषयावर भविष्यातील विकासाची दिशा कशी असावी ?

  1. शेतीचा पाणीपुरवठा : स्प्रिंकलर | ठिबक | पाटाचे पाणी | शेततळी | विहीर | पंप
  2. निविष्ठा : बियाणे | खत आणि कीटकनाशक | शेती अवजारे
  3. अर्थसाह्य : पिक कर्ज | पिक विमा | अनुदान
  4. फळ व फुल शेती : फळ लागवड | फूल लागवड | भाजीपाला
  5. पशुधन : गुरांचा दवाखाना | कुक्कुटपालन | शेळी-मेंढीपालन | वराहपालन
  6. शेतीपूरक उत्पादन : पॉलिहाऊस | शेतीमाल प्रक्रिया उद्योग | दूध उत्पादन | दुग्धजन्य पदार्थ | अंडी उत्पादन | चिकन मटण मासे उत्पादन

  मित्रहो काल आणि परवा *ग्रामीण शिक्षणाच्या* सुधारणांसाठी अतिशय सकस अशी चर्चा झाली आणि त्यातून खूप चांगल्या सूचना आल्यात आजही ती चर्चा सुरू आहेच. *ग्रामीण आरोग्य सेवा* आणि त्या सुधारणांच्या दृष्टिकोनातून नेमकं काय केलं पाहिजे यावर आजच चर्चा सुरू झाली.

 • टिपणी / आवाहन क्रमांक ४ (बुधवार, ८ एप्रिल २०२०)

  4

  समग्र विकास: नोकरी, ग्रामीण तंत्रज्ञान व कौशल्यविकास

  पर्यावरणात झालेल्या बदलामुळे सततचा दुष्काळ, वादळ वारा गारपीट आणि कधी पुरामुळे होणारे शेतीचे नुकसान आणि तुटपुंजी शेती या पार्श्वभूमीवर गावातले तरुण कोणती ना कोणती तरी नोकरी किंवा कौशल्य आधारित कोणता ना कोणता व्यवसाय करण्याचा प्रयत्न करतात आणि आपली उपजीविका भागवतात. सध्याच्या यांत्रिकीकरणाच्या युगात गावातील हे लहान व्यवसाय खरंच तग धरू शकतात का ? किंवा एका गावाच्या भरोशावर त्या व्यवसायातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतात का? हा एक मोठाच प्रश्न आहे.

  त्यासाठी *समग्र विकास: नोकरी, ग्रामीण तंत्रज्ञान व कौशल्यविकास* या विषयावर चर्चा करण्यासाठी या क्षेत्रातील कार्यरत असणारे मान्यवर संस्था आणि त्यांचे प्रतिनिधी किंवा दिग्गज यांना आम्ही निमंत्रित करत आहोत.

  ज्यांच्यापर्यंत आम्ही थेट पोहोचू शकलो नाहीत त्यांनी आमच्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी व्हाट्सअप्प मेसेज करावा. आपलं काम आणि अनुभव योग्य वाटल्यास आम्ही आपणास चर्चेसाठी पाचारण करु. धन्यवाद !

  खालील सर्वच विषयावर भविष्यातील विकासाची दिशा कशी असावी ?

  1. नोकरी, रोजगार , कौशल्य - ग्रामीण तंत्रज्ञान : सरकारी नोकरी | खाजगी नोकरी | शेतमजूर | मोलकरीण
  2. कौशल्य आधारित रोजगार : कुंभारकाम | कोळी काम | पशुपालक | चर्मकार | स्वच्छता कामगार | केशकर्तन कार | परीट काम | पौरोहित्य | लोहारकाम | सुतारकाम | वर्कशॉप | ग्रामीण तंत्रज्ञान | वाहतूक
  3. गावातील व्यापार व्यवसाय : पिठाची गिरणी | किरणा कापड | जनरल स्टोअर्स | हार्डवेअर | सोनार | पान टपरी | दारूचे दुकान | विडिओ पार्लर

  मित्रहो काल आणि परवा *ग्रामीण शिक्षणाच्या* सुधारणांसाठी अतिशय सकस अशी चर्चा झाली आणि त्यातून खूप चांगल्या सूचना आल्यात आणि आता त्याचा अहवाल बनण्याची प्रक्रिया सुरू आहे. *ग्रामीण आरोग्य सेवा* आणि त्या सुधारणांच्या दृष्टिकोनातून नेमकं काय केलं पाहिजे यावर चर्चा सुरू आहे या चर्चेसाठी आम्हाला आणखीही काही तज्ञ लोकांची ची गरज भासत आहे त्यांना इच्छा असेल त्यांनी जरूर कळवावे. आजच *शेती पशुधन आणि शेती पूरक व्यवसाय* या विषयावर चर्चा सुरू झाली आणि दिवस अखेर खूप मोठ्या प्रमाणावर येथे विविध घटकांवर मंथन झाले.

 • टिपणी / आवाहन क्रमांक ५ (गुरूवार, ९ एप्रिल २०२०)

  5

  समग्र विकास: महिला सक्षमीकरण व बालविकास

  पर्यावरणात झालेल्या बदलामुळे सततचा दुष्काळ, वादळ वारा गारपीट आणि कधी पुरामुळे होणारे शेतीचे नुकसान आणि तुटपुंजी शेती या पार्श्वभूमीवर गावा गावाकडील वातावरण दिवसेंदिवस फार जिकरीचे होत चाललेले आहे ग्रामीण भागामध्ये महिलेला दुहेरी कष्ट उपसावे लागतात तिकडे घरातील स्वयंपाकका पासून धुणीभांडी मुलांचं सगळं करून घरातल्या सर्वांची मर्जी सांभाळणे त्याचबरोबर बाहेर शेतात राबणे किंवा बचत गटाच्या माध्यमातून कुठला तरी एखादा छोटासा व्यवसाय करणे त्यात तिचा मोठ्या प्रमाणावर शारीरिक मानसिक आणि भावनिक आघाड्यांवर तिला सामना करावा लागतो. म्हणूनच महिलांचे सक्षमीकरण होणे हे हे अधिक गरजेचे आहे.

  त्यासाठी *समग्र विकास: नोकरी, ग्रामीण तंत्रज्ञान व कौशल्यविकास* या विषयावर चर्चा करण्यासाठी या क्षेत्रातील कार्यरत असणारे मान्यवर संस्था आणि त्यांचे प्रतिनिधी किंवा दिग्गज यांना आम्ही निमंत्रित करत आहोत.

  ज्यांच्यापर्यंत आम्ही थेट पोहोचू शकलो नाहीत त्यांनी आमच्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी व्हाट्सअप्प मेसेज करावा. आपलं काम आणि अनुभव योग्य वाटल्यास आम्ही आपणास चर्चेसाठी पाचारण करु. धन्यवाद !

  खालील सर्वच विषयावर भविष्यातील विकासाची दिशा कशी असावी ?

  महिला सक्षमीकरण व बालकल्याण : मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण | महिलांचे स्वतंत्र बँक खाते | महिलांचे स्थावर मालमत्तेवर नोंदीचे प्रमाण | | महिलांचे स्वतंत्र उद्योग | महिला बचत गट | स्वतंत्र नोकरी करणाऱ्या महिलांचे प्रमाण | महिलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य | स्त्रीप्रश्न जनजागृती | कुटुंब संगोपन कुपोषण | बाळंतपणातील काळजी | बाळंतपणातील आहार | बाळाचे लसीकरण | बाळाचा आहार | अंगणवाडीतील शिक्षण

  मित्रहो आतापर्यंत *ग्रामीण शिक्षणाच्या* सुधारणांसाठी अतिशय सकस अशी चर्चा झाली आणि त्यातून खूप चांगल्या सूचना आल्यात आणि आता त्याचा अहवाल बनण्याची प्रक्रिया सुरू आहे. *ग्रामीण आरोग्य सेवा* आणि त्या सुधारणांच्या दृष्टिकोनातून नेमकं काय केलं पाहिजे यावर चर्चा सुरू आहे.तसेच *शेती पशुधन आणि शेती पूरक व्यवसाय* या विषयावर उत्तम चर्चा आहे सुरू आहे आणि आज *ग्रामीण नोकरी-व्यवसाय ग्रामीण तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास* यावर चांगली चर्चा सुरू झाली आणि दिवस अखेर खूप मोठ्या प्रमाणावर येथे विविध घटकांवर मंथन झाले. या विषयावर चर्चा सुरू झाली आणि दिवस अखेर खूप मोठ्या प्रमाणावर येथे विविध घटकांवर मंथन झाले.

 • टिपणी / आवाहन क्रमांक ६ (शुक्रवार, १० एप्रिल २०२०)

  6

  समग्र विकास: कौटुंबिक आणि सामाजिक समस्या निराकरण

  पर्यावरणात झालेल्या बदलामुळे सततचा दुष्काळ, वादळ वारा गारपीट आणि कधी पुरामुळे होणारे शेतीचे नुकसान आणि तुटपुंजी शेती या पार्श्वभूमीवर गावा गावाकडील जीवनमान फार जिकरीचे होत चाललेले आहे. तरुणांनी उपजीविकेच्या निमित्त्याने शहरांकडे धाव घेतल्याने गावांमध्ये केवळ ज्येष्ठ नागरिक उरलेले आहेत आणि जे तरुण आहेत त्यांच्या हाताशी कोणते काम नाही. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये कौटुंबिक आणि सामाजिक समस्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात तोंड वर काढले आहे. त्या समस्यांचा उवापोह करून त्यावर योग्य ते हे उपाय सुचवावेत यासाठी ही व्हाट्सअप चर्चा आयोजित केलेली आहे.

  ज्यांच्यापर्यंत आम्ही थेट पोहोचू शकलो नाहीत त्यांनी आमच्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी व्हाट्सअप्प मेसेज करावा. आपलं काम आणि अनुभव योग्य वाटल्यास आम्ही आपणास चर्चेसाठी पाचारण करु. धन्यवाद !

  खालील सर्वच विषयावर भविष्यातील विकासाची दिशा कशी असावी ?

  1. सामाजिक समस्या : आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह | गुंडगिरी व जातीय दंगली | मागासवर्गीय समस्या | जंगल आणि जमिनीवरचा हक्क | मानवी देह व्यापार | बालकामगार | बेघरांचे प्रश्न | खाजगी सावकाराकडून कर्ज व्यसनमुक्ती : दारू तंबाखू सिगरेट,विडी | जातपंचायत | अंधश्रद्धा
  2. कौटुंबिक समस्या: महिलांचे प्रश्न | प्रतिनिधित्व नसणे | अन्याय्य वागणूक | कौटुंबिक अत्याचार | लैंगिक अत्याचार | बलात्कार | कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण | स्त्री भ्रूणहत्या | हुंडाबळी | ऑनर किलिंग | बालविवाह महिला व पुरुषांच्या समस्या | विवाह जमण्यास अडचणी | स्त्री अत्याचार पीडित पुरुष | घटस्फोटित प्रमाण | आत्महत्येचे प्रमाण
  3. ज्येष्ठ नागरिक समस्या : शारीरिक | मानसिक | सामाजिक | भावनिक | आर्थिक

  मित्रहो काल आणि परवा *ग्रामीण शिक्षणाच्या* सुधारणांसाठी अतिशय सकस अशी चर्चा झाली आणि त्यातून खूप चांगल्या सूचना आल्यात आणि आता त्याचा अहवाल बनण्याची प्रक्रिया सुरू आहे. *ग्रामीण आरोग्य सेवा* आणि त्या सुधारणांच्या दृष्टिकोनातून नेमकं काय केलं पाहिजे यावर चर्चा सुरू आहे या चर्चेसाठी आम्हाला आणखीही काही तज्ञ लोकांची ची गरज भासत आहे त्यांना इच्छा असेल त्यांनी जरूर कळवावे. आजच *शेती पशुधन आणि शेती पूरक व्यवसाय* या विषयावर चर्चा सुरू झाली आणि दिवस अखेर खूप मोठ्या प्रमाणावर येथे विविध घटकांवर मंथन झाले.

 • टिपणी / आवाहन क्रमांक ७ (शनिवार, ११ एप्रिल २०२०)

  7

  समग्र विकास: पायाभूत सुविधा

  पर्यावरणात झालेल्या बदलामुळे सततचा दुष्काळ, वादळ वारा गारपीट आणि कधी पुरामुळे होणारे शेतीचे नुकसान आणि तुटपुंजी शेती या पार्श्वभूमीवर गावा गावाकडील जीवनमान फार जिकरीचे होत चाललेले आहे. तरुणांनी उपजीविकेच्या निमित्त्याने शहरांकडे धाव घेतल्याने गावांमध्ये केवळ ज्येष्ठ नागरिक उरलेले आहेत आणि जे तरुण आहेत त्यांच्या हाताशी कोणते काम नाही. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये कौटुंबिक आणि सामाजिक समस्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात तोंड वर काढले आहे. त्या समस्यांचा उवापोह करून त्यावर योग्य ते हे उपाय सुचवावेत यासाठी ही व्हाट्सअप चर्चा आयोजित केलेली आहे.

  ज्यांच्यापर्यंत आम्ही थेट पोहोचू शकलो नाहीत त्यांनी आमच्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी व्हाट्सअप्प मेसेज करावा. आपलं काम आणि अनुभव योग्य वाटल्यास आम्ही आपणास चर्चेसाठी पाचारण करु. धन्यवाद !

  खालील सर्वच विषयावर भविष्यातील विकासाची दिशा कशी असावी ?

  वीज पाणी आणि रस्ते

  1. वीज : घरगुती जोडणी | रस्त्याची वीज | शेत पंपाची वीज | लोडशेडिंगचे प्रमाण | वीजगळती वीजचोरी | सौर ऊर्जा वीज
  2. पाणी: पिण्याचे पाणी | शेतीचे पाणी
  3. पाण्याचे स्रोत :तलाव | शेततळी | विहिरी | कॅनाल | कूपनलिका

   पाणीपुरवठा :व्यक्तिगत | सार्वजनिक नळ | पाणपोई | पाण्याचे एटीएम | टँकर | पाणी मीटर यंत्रणा | पाणीपट्टी वसुली

  4. रस्ते व दळणवळण :गावातील रस्ते | शेत रस्ते | बारमाही रस्ते | मुरुमाचे रस्ते | पांदण रस्ते | नाल्यावरील पूल
  5. दळणवळण : राज्य बस सेवा | दूरध्वनी | भ्रमणध्वनी | टपाल व्यवस्था | इंटरनेट | वायरलेस | ब्रॉडबँड

  मित्रहो काल आणि परवा *ग्रामीण शिक्षणाच्या* सुधारणांसाठी अतिशय सकस अशी चर्चा झाली आणि त्यातून खूप चांगल्या सूचना आल्यात आणि आता त्याचा अहवाल बनण्याची प्रक्रिया सुरू आहे. *ग्रामीण आरोग्य सेवा* आणि त्या सुधारणांच्या दृष्टिकोनातून नेमकं काय केलं पाहिजे यावर चर्चा सुरू आहे या चर्चेसाठी आम्हाला आणखीही काही तज्ञ लोकांची ची गरज भासत आहे त्यांना इच्छा असेल त्यांनी जरूर कळवावे. आजच *शेती पशुधन आणि शेती पूरक व्यवसाय* या विषयावर चर्चा सुरू झाली आणि दिवस अखेर खूप मोठ्या प्रमाणावर येथे विविध घटकांवर मंथन झाले.

 • टिपणी / आवाहन क्रमांक ८ (रविवार, १२ एप्रिल २०२०)

  8

  समग्र विकास : ग्राम-स्वच्छता आणि पर्यावरण

  गावखेड्यात सर्वात जास्त महत्त्वाची जर बाब असेल तर ती गावाची स्वच्छता. कोणत्याही गावात जा, अस्वच्छता ही जणू काही पाचवीला पुजलेली आहे. फार थोडी गावं अशी आहेत की ज्या गावांमध्ये नियमित स्वच्छता होते. तेथील गटारं स्वच्छ आहेत किंवा सांडपाण्याचा निचरा योग्य रीतीने होतो. खरतर या सगळ्या गोष्टींसाठी सरकारी योजना आहेत आणि त्यासाठी *स्वच्छ भारत मिशन* हे ग्रामस्वच्छता अभियान मोठ्या प्रमाणावर राबवले गेलेले आहे तरीसुद्धा गावाकडे जिकडेतिकडे फार मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता दिसते. गावागावातून संडास बांधले गेले असले तरी हागणदारी मुक्ती हा केवळ कागदावर लिहिण्याचा भाग आहे.

  त्याचप्रमाणे पर्यावरणाच्या बाबतीत सांगायचे झाल्यास त्याची जेवढी म्हणून काही वाट लावायची होती ती या मनुष्यप्राण्याने लावलेली आहे. त्या प्रक्रियेत ग्रामीण भाग त्यामानाने थोडासा मागे होता मात्र शहरांनी ज्या पद्धतीने पर्यावरणाची वाट लावली त्याचेच फळ आपण वेगळ्या स्वरूपात भोगतो आहोत. प्रकृतीला स्वतःला रिसेट होण्यासाठीचा वेळ मिळाला तर ती किती उत्तम रीतीने स्वतःला सावरून घेते हे सध्या आपण बघतच आहोत. खरतर या चांगल्या प्रकृतीचा आपण मानवाने केवळ चंगळवादी आणि भोगवादी प्रवृत्तीने ऱ्हास केला. खऱ्या अर्थाने आता आपल्याला स्वतःलाच बदलण्याची वेळ आलेली आहे. चला तर चर्चा करूया ग्रामीण भागातील स्वच्छतेची आणि पर्यावरणाची.

  ज्यांच्यापर्यंत आम्ही थेट पोहोचू शकलो नाहीत त्यांनी आमच्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी व्हाट्सअप्प मेसेज करावा. आपलं काम आणि अनुभव योग्य वाटल्यास आम्ही आपणास चर्चेसाठी पाचारण करु. धन्यवाद !

  खालील सर्वच विषयावर भविष्यातील विकासाची दिशा कशी असावी ?

  1. ओला सुका कचरा प्रक्रिया :गांडूळ खत | हागणदारी मुक्त गाव | बाजार स्वच्छता | रस्ते सफाई | कचरापेटी | नियमित गटर सफाई | सार्वजनिक संडास मुतारी | धोबीघाट | पाणवठा | सांडपाणी पुनर्वापर | गावातील वॉश बेसिन | स्मशान घाट स्वच्छता | मृत जनावरांची विल्हेवाट | मासिक पाळी पॅड / डायपर व्यवस्थापन शोषखड्डे
  2. वृक्षसंवर्धन :घरटी झाडे | माळावरची झाडे | रस्त्याच्या दुतर्फा झाडे | अमराई | वनराई | देवराई | बगीचा | रोपवाटीका | परसबाग

  मित्रहो आतापर्यंत *ग्रामीण शिक्षणाच्या* सुधारणांसाठी अतिशय सकस अशी चर्चा झाली आणि त्यातून खूप चांगल्या सूचना आल्यात आणि आता त्याचा अहवाल बनण्याची प्रक्रिया सुरू आहे. *ग्रामीण आरोग्य सेवा* आणि त्या सुधारणांच्या दृष्टिकोनातून नेमकं काय केलं पाहिजे यावर चर्चा सुरू आहे.तसेच *शेती पशुधन आणि शेती पूरक व्यवसाय* या विषयावर उत्तम चर्चा आहे सुरूआहे आणि आज *ग्रामीण नोकरी-व्यवसाय ग्रामीण तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास* *महिला सक्षमीकरण आणि बालविकास*, *सामाजिक व कौटुंबिक समस्या* आणि आज पायाभूत सुविधा : वीज पाणी आणि रस्ते व दळणवळण यावर चर्चा सुरू झाली आहे.

 • टिपणी / आवाहन क्रमांक ९ (सोमवार, १३ एप्रिल २०२०)

  9

  समग्र विकास: आपत्ती व्यवस्थापन

  नैसर्गिक आपत्ती कधी आणि कशी येईल हे काहीच सांगता येत नाही. सध्याच्या कोरोनाच्या उदाहरणावरून आपणास लक्षात येईल कोविड 19 या विषाणूने संपूर्ण जगाला वेठीस धरलेलं आहे. जगातली जवळपास 85 टक्के जनता आपापल्या घरात बंदिस्त झालेली आहे. स्वतःला विकासाचे महामेरू समजणारे देश देखील या विषाणूच्या पुढे हतबल झालेले आहेत. भारतातही या विषाणूने आपला कहर दाखवायला सुरुवात केलेली आहे. एवढी मोठी आपत्ती मागील शंभर वर्षात कधी बघितली नव्हती आणि अर्थातच त्यामुळे कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी असणे हे काही शक्य नव्हते. या जिवाणू विषाणू-प्रमाणेच पर्यावरणाच्या बदलाने निसर्गही हल्ली फार मोठ्या प्रमाणावर लहरी झालेला आहे.

  पूर, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट विज पडणे, तर कधी गरज असताना पाऊस न पडून होणारा कोरडा दुष्काळ, वनवा, भुकम्प रोगराई या नैसर्गिक तर जंगली श्वापदांचा हल्ला, साप, विंचू, कुत्रा चावणे, रस्त्यांवरील अपघात या सर्व मानवनिर्मित आपत्तीचा सामना करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला तयार राहिले पाहिजे. अन्यथा फार मोठ्या प्रमाणावर मनुष्यहानी आणि मालाचे नुकसान होऊ शकते. हे सगळं नीट समजून घेण्यासाठी आपण आपत्ती व्यवस्थापनाची चर्चा करणार आहोत.

  ज्यांच्यापर्यंत आम्ही थेट पोहोचू शकलो नाहीत त्यांनी आमच्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी व्हाट्सअप्प मेसेज करावा. आपलं काम आणि अनुभव योग्य वाटल्यास आम्ही आपणास चर्चेसाठी पाचारण करु. धन्यवाद !

  खालील सर्वच विषयावर भविष्यातील विकासाची दिशा कशी असावी ?

  पूर/अतिवृष्टी / अवकाळी पाऊस/गारपीट | विज पडणे | वणवा | भूकंप | रोगराई | जंगली श्वापदांचा हल्ला | साप, विंचू, कुत्रे चावणे | रस्ते अपघात | जिवाणू विषाणूंचा हल्ला

  मित्रहो आतापर्यंत *ग्रामीण शिक्षणाच्या* सुधारणांसाठी अतिशय सकस अशी चर्चा झाली आणि त्यातून खूप चांगल्या सूचना आल्यात आणि आता त्याचा अहवाल बनण्याची प्रक्रिया सुरू आहे. *ग्रामीण आरोग्य सेवा* आणि त्या सुधारणांच्या दृष्टिकोनातून नेमकं काय केलं पाहिजे यावर चर्चा सुरू आहे.तसेच *शेती पशुधन आणि शेती पूरक व्यवसाय* या विषयावर उत्तम चर्चा आहे सुरूआहे आणि आज *ग्रामीण नोकरी-व्यवसाय ग्रामीण तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास* *महिला सक्षमीकरण आणि बालविकास*, *सामाजिक व कौटुंबिक समस्या* पायाभूत सुविधा : वीज पाणी आणि रस्ते व दळणवळण, आणि आज *ग्रामस्वच्छता आणि पर्यावरण* यावर चर्चा सुरू झाली आहे.

 • टिपणी / आवाहन क्रमांक १० (मंगळवार, १४ एप्रिल २०२०)

  10

  समग्र विकास : जनजागरण - प्रशिक्षण/ संवाद /शिबिर /प्रबोधन

  प्रत्येक गावात सरकारने सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वेगवेगळी यंत्रणा राबवलेली आहे. गावची यंत्रणा ग्रामपंचायत, तालुक्याच्या बपातळीवर पंचायत समिती, जिल्ह्याच्या पातळीवर जिल्हा परिषद ही ग्रामविकासासाठी कटिबद्ध असलेली शासकीय यंत्रणा आणि त्याच्याबरोबर प्रत्येक गाव हे महसुली केंद्र असल्याने प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांच्यापासून तर तालुक्याला गटविकास अधिकारी आणि गावा पर्यंत तलाठ्याची नियुक्ती केलेली आहे एवढी मोठी यंत्रणा राज्य पातळीवरील सरकार वेगवेगळ्या खात्यांच्या मार्फत मंत्रालयातून राबवते आणि त्याला जोड केंद्रातून प्रत्येक घटकासाठी काही ना काही योजना आहेतच.

  सरकारी योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्याची अंमलबजावणी करून योग्य तो परिमाण साधण्यासाठी प्रशिक्षण/ संवाद /शिबिर /प्रबोधन होणे गरजेचे आहे. मात्र ते घडतच नसल्याने त्या योजनांचा खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही इथेच खऱ्या अर्थाने जनजागरण कमी पडते.

  ज्यांच्यापर्यंत आम्ही थेट पोहोचू शकलो नाहीत त्यांनी आमच्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी व्हाट्सअप्प मेसेज करावा. आपलं काम आणि अनुभव योग्य वाटल्यास आम्ही आपणास चर्चेसाठी पाचारण करु. धन्यवाद !

  खालील सर्वच विषयावर भविष्यातील विकासाची दिशा कशी असावी ?

  कौशल्य विकास प्रशिक्षण | स्वयंरोजगार प्रशिक्षण | शिक्षक प्रशिक्षण | महिला सक्षमीकरण प्रशिक्षण कृषी प्रशिक्षण | ग्रामीण तांत्रिक प्रशिक्षण | बालक-पालक संवाद | युवा युवती संवाद | महिला शेतकरी जेष्ठ नागरिक संवाद | आरोग्य शिबीर | रक्तदान शिबीर | रोजगार मेळावा | एनएसएस कॅम्प | कायदेविषयक शिबिर | योग मेडिटेशन प्राणायाम शिबिर | पालक प्रबोधन | युवा युवती प्रबोधन महिला प्रबोधन शेतकरीप्रबोधन | ज्येष्ठ नागरिक प्रबोधन

  मित्रहो आतापर्यंत *ग्रामीण शिक्षणाच्या* सुधारणांसाठी अतिशय सकस अशी चर्चा झाली आणि त्यातून खूप चांगल्या सूचना आल्यात आणि आता त्याचा अहवाल बनण्याची प्रक्रिया सुरू आहे. *ग्रामीण आरोग्य सेवा* आणि त्या सुधारणांच्या दृष्टिकोनातून नेमकं काय केलं पाहिजे यावर चर्चा सुरू आहे.तसेच *शेती पशुधन आणि शेती पूरक व्यवसाय* या विषयावर उत्तम चर्चा आहे सुरूआहे आणि आज *ग्रामीण नोकरी-व्यवसाय ग्रामीण तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास* *महिला सक्षमीकरण आणि बालविकास*, *सामाजिक व कौटुंबिक समस्या* पायाभूत सुविधा : वीज पाणी आणि रस्ते व दळणवळण, *ग्रामस्वच्छता आणि पर्यावरण* आणि आज *आपत्ती व्यवस्थापन* या विषयावर चर्चा सुरू झाली आहे.

 • टिपणी / आवाहन क्रमांक ११ (बुधवार, १५ एप्रिल २०२०)

  11

  समग्र विकास : सहकार व शेती उत्पादक कंपन्या

  ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाच्या जो काही विकास झाला त्यामध्ये सहकार क्षेत्राचा वाटा प्राधान्याने आहे असं म्हणतात. गाव करील ते राव काय करील? याचाच अर्थ एकट्या-दुकट्या मनुष्याला मर्यादा येतात, पण चार लोकं एकत्र आलीत तर नक्कीच सगळ्यांना त्याचा फायदा होतो,सहकाराचे सूत्र नेमकं हेच आहे. *सहकारातून समृद्धीकडे* हा मंत्र झाला आणि त्यातून लोकांचा विकास/भरभराट झालेली आपण पाहतो. सहकार क्षेत्र हे राजकारणाचा मूळ आखाडा आहे. त्यामुळे या क्षेत्रातील काही अपप्रवृत्तीमूळे सहकार क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणावर बदनाम झालेलं आहे. त्यातील वाईट बाजू आपण बाजूला ठेऊ, परंतु सहकाराची मूळ संकल्पना ही सर्वांनाच पुढे घेऊन जाणारी आहे.

  तसेच हल्लीच्या काळात जमीन धारणा क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत चालल्याने कमी जागेत होणारी शेती परवडेनाशी झाली. त्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन शेती कंपन्या स्थापन केल्या. आणि त्यात रोख पीक आणि फळाफुलांची शेती करायला सुरुवात केल्याने काही भागांमध्ये समृद्धी आली. सहकारामध्ये असलेल्या काही वाईट प्रथा/प्रवृत्तीवर उपाय म्हणून शेती कंपन्या स्थापन झाल्याने सहकारातील काही वाईट प्रवृत्तीना लगामही लागला.

  समग्र ग्रामविकासाच्या संकल्पनेतही सहकार हा परवलीचा शब्द आहे आणि तो विषय अटळ आहे. मग ती सोसायटी असो की शेती उत्पादक कंपनी, समग्र ग्रामविकास साधायचा असेल तर सहकारास पर्याय नाही. 'विना सहकार नही उद्धार' या संकल्पनेत ग्रामविकास सामावलेला आहे. त्या अनुषंगाने ग्रामीण विकासासाठी ज्या निरनिराळ्या सहकारी संस्था आणि शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत, त्यांचे समग्र ग्रामविकासासाठी काय योगदान राहील, याची सांगोपांग चर्चा आपणास यानिमित्ताने करायची आहे.

  ज्यांच्यापर्यंत आम्ही थेट पोहोचू शकलो नाहीत त्यांनी आमच्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी व्हाट्सअप्प मेसेज करावा. आपलं काम आणि अनुभव योग्य वाटल्यास आम्ही आपणास चर्चेसाठी पाचारण करु. धन्यवाद !

  खालील सर्वच विषयावर भविष्यातील विकासाची दिशा कशी असावी ?

  विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था पतसंस्था दूध उत्पादक संस्था | शेळी मेंढी पालन संस्था | मत्स्य उद्योग संस्था | उद्योग संस्था | सहकारी कुकूटपालन संस्था | खादी ग्राम उद्योग संस्था | कामगार संस्था | शेतकरी उत्पादक संस्था

  मित्रहो आतापर्यंत *ग्रामीण शिक्षणाच्या* सुधारणांसाठी अतिशय सकस अशी चर्चा झाली आणि त्यातून खूप चांगल्या सूचना आल्यात आणि आता त्याचा अहवाल बनण्याची प्रक्रिया सुरू आहे. *ग्रामीण आरोग्य सेवा* आणि त्या सुधारणांच्या दृष्टिकोनातून नेमकं काय केलं पाहिजे यावर चर्चा सुरू आहे.तसेच *शेती पशुधन आणि शेती पूरक व्यवसाय* या विषयावर उत्तम चर्चा आहे सुरूआहे आणि आज *ग्रामीण नोकरी-व्यवसाय ग्रामीण तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास* *महिला सक्षमीकरण आणि बालविकास*, *सामाजिक व कौटुंबिक समस्या* पायाभूत सुविधा : वीज पाणी आणि रस्ते व दळणवळण, *ग्रामस्वच्छता आणि पर्यावरण*, *आपत्ती व्यवस्थापन* आणि आज *जनजागरण* या विषयावर चर्चा सुरू झाली आहे.

 • टिपणी / आवाहन क्रमांक १२ (गुरूवार, १६ एप्रिल २०२०)

  12

  संस्कृती संवर्धन : कला/ क्रीडा /साहित्य/ मनोरंजन आणि पर्यटन

  कोणतेही गाव म्हटलं की त्या गावाची एक विशिष्ट अशी संस्कृती असते. त्या गावाच्या काही चालीरीती असतात. त्या गावात कोणत्या ना कोणत्या तरी देवस्थानाची संबंधित जत्रा/ उरुस साजरा केला जातो. गाव जर वारकरी संप्रदायाचे असेल तर गावाची वारकरी दिंडी असते. गावांमध्ये सप्ताह साजरा केला जातो. या सप्ताहामध्ये विविध सामाजिक विषयांवर प्रबोधन करणारे वारकरी संप्रदायातील मार्गदर्शक बोलवले जातात. सातही दिवस गाव एकत्रीत जेवण करत असतं. बरेचश्या गावांमध्ये या सप्ताहावर लाखो रुपये उधळले जातात, मात्र ग्रामविकासासाठी लागणाऱ्या छोट्या छोट्या सुविधांकडे दुर्लक्ष करतात. शिक्षण, सार्वजनिक स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले जाते. या बाबतीत गावकऱ्यांचे प्रबोधन फार गरजेचे आहे.

  काही गावांमध्ये त्यांचं कलापथक असते. कोकणात विशेष करून दशावतार आणि विदर्भात दंडार आणि मराठवाड्यामध्ये बहुरूपी, वाघ्या मुरळी आपल्या संस्कृतीचे प्रदर्शन करत असतात. आज-काल गावागावातून साहित्याची आवड पूर्ण करण्यासाठी वाचनालय /ग्रंथालय सुरू झालेले आहेत. गावामध्ये मैदानी खेळ विशेषकरुन कबड्डी खोखो व्हॉलीबॉल आणि हल्ली क्रिकेट तसेच फुटबॉल देखील खेळतात. पश्चिम महाराष्ट्रात गावाचं लेझीम पथक झांज पथक असतं. गावाकडे मनोरंजनासाठी शक्यतो तमाशा वर्षातून एखादं दुसरं नाटक किंवा गावात विविध स्पर्धा भरवण्यात ग्राम विकास मंडळ आघाडीवर असते. गावातला गणेशोत्सव शारदोत्सव आणि वेगवेगळ्या महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करण्यात गावकरी आघाडीवर असतात.

  गावामध्ये मैदानी खेळ विशेषकरुन कबड्डी खोखो व्हॉलीबॉल आणि हल्ली क्रिकेट तसेच फुटबॉल देखील खेळतात. पश्चिम महाराष्ट्रात गावाचं लेझीम पथक झांज पथक असतं. गावाकडे मनोरंजनासाठी शक्यतो तमाशा वर्षातून एखादं दुसरं नाटक किंवा गावात विविध स्पर्धा भरवण्यात ग्राम विकास मंडळ आघाडीवर असते. गावातला गणेशोत्सव शारदोत्सव आणि वेगवेगळ्या महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करण्यात गावकरी आघाडीवर असतात. एखादा गाव धार्मिक किंवा नैसर्गिक पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध असते. अशा गावात पर्यटनामुळे गावाची संस्कृती आणि आर्थिक उलाढाल बऱ्यापैकी चांगली होते.

  ज्यांच्यापर्यंत आम्ही थेट पोहोचू शकलो नाहीत त्यांनी आमच्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी व्हाट्सअप्प मेसेज करावा. आपलं काम आणि अनुभव योग्य वाटल्यास आम्ही आपणास चर्चेसाठी पाचारण करु. धन्यवाद !

  खालील सर्वच विषयावर भविष्यातील विकासाची दिशा कशी असावी ?

  1. संस्कृती संवर्धन :समाज मंदिर | मंदिर | मस्जिद | चर्च | बौद्धविहार
  2. मनोरंजन :कलापथक | दशावतार | बहुरूपी सोंग
  3. साहित्य :वाचनालय | ग्रंथालय
  4. क्रीडा :कबड्डी | खो-खो | क्रिकेट | व्हॉलीबॉल | फुटबॉल | कॅरम | बुद्धिबळ | पोहणे
  5. संस्कृती :भजन, कीर्तन, हरिपाठ, जत्रा, यात्रा दिंडी वारकरी | युवक-युवती मंडळ | ग्रामविकास मंडळ आणि पर्यटन स्थळ

  मित्रहो आतापर्यंत ग्रामीण शिक्षणाच्या सुधारणांसाठी अतिशय सकस अशी चर्चा झाली आणि त्यातून खूप चांगल्या सूचना आल्यात आणि आता त्याचा अहवाल बनण्याची प्रक्रिया सुरू आहे. ग्रामीण आरोग्य सेवा आणि त्या सुधारणांच्या दृष्टिकोनातून नेमकं काय केलं पाहिजे यावर चर्चा सुरू आहे.तसेच शेती पशुधन आणि शेती पूरक व्यवसाय या विषयावर उत्तम चर्चा आहे सुरू आहे आणि आज ग्रामीण नोकरी-व्यवसाय ग्रामीण तंत्रज्ञान आणि कौशल्य विकास महिला सक्षमीकरण आणि बालविकास, सामाजिक व कौटुंबिक समस्या पायाभूत सुविधा : वीज पाणी आणि रस्ते व दळणवळण, ग्रामस्वच्छता आणि पर्यावरण, आपत्ती व्यवस्थापन , जनजागरण आणि आज सहकार आणि शेती कंपन्या या विषयावर चर्चा सुरू झाली आहे.

वरील ग्रुपमध्ये ज्यांना चर्चेसाठी अजूनही यायचं आहे त्यांनी आम्हाला कळवावे. संपर्कासाठी: हरीश बुटले (9422001560)

Concept By : Harish Butle

Links